हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची आज जयंती आहे. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नवी दिशा दाखवली होती. त्यांच्या निधनाने देशाचे मोठं नुकसान झालं होत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि राजीव गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पप्पा, तुमच्या खुणा माझा रस्ता आहे असं राहुल गांधी यांनी म्हंटल.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल कि, बाबा, भारतासाठी तुमची जी स्वप्ने होती ती या अनमोल आठवणींतून ओसंडून वाहतात. तुमच्या जखमा हा माझा मार्ग आहे. प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्ने समजून मी समजून घेतोय, मी आपल्या भारतमातेचा आवाज ऐकतोय असं म्हणत राहुल गांधी राजीव गांधी यांच्या आठवणीत भावुक झाले.
पापा, आपकी आंखों में भारत के लिए जो सपने थे, इन अनमोल यादों से छलकते हैं।
आपके निशान मेरा रास्ता हैं – हर हिंदुस्तानी के संघर्षों और सपनों को समझ रहा हूं, भारत मां की आवाज़ सुन रहा हूं। pic.twitter.com/VqkbxoPP7l
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 20, 2023
दरम्यान, काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून राजीव गांधी याना आदरांजली वाहिली आहे. 21व्या शतकातील भारताचे शिल्पकार राजीव गांधी यांना ‘माहिती तंत्रज्ञानाचे जनक’ म्हणून गौरवले जाते. एक उत्कृष्ट नेता, त्यांच्या दूरदृष्टीने भारतीय राजकारणावर अमिट छाप सोडली. ज्यांनी देश कायमचा बदलला त्या भारताच्या सर्वात तरुण पंतप्रधानांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.
दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले होते. राजीव गांधी हे देशाचे नववे आणि सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी मोठा कायापालट केला. राजीव गांधी यांनीच भारताला संगणकाची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली. भारत हा तरुणांचा देश असून याच तरुणाईच्या बळावर देशाची प्रगती व्हावी हाच त्यांचा मानस होता. मात्र १९९१ मध्ये तामिळनाडू मध्ये मानवी बॉम्बच्या साहाय्याने राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली.