सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन क्रूरतेवर उतरलंय ; व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशभर खळबळ उडाली आहे. देशभरात या घटनेचा निषेध केला जात आहे. तर विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच पीडितेच्या कुटुंबीयांवर प्रशासनाकडून इतरांना भेटण्यासाठी रोखलं जात असल्याचं वृत्त असून, याविषयी राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट करून निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून पुन्हा एकदा उत्तर प्रदेश प्रशासनावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलणाऱ्या पीडितेच्या नातेवाईकाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “उत्तर प्रदेश प्रशासन सत्य लपवण्यासाठी क्ररतेवर उतरलं आहे. ना आम्हाला, ना माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांशी भेट दिलं. त्याचबरोबर त्यांनाही बाहेर येऊ दिलं जात नाहीये. वरून पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण आणि असभ्य वर्तन केलं जात आहे. कोणताही भारतीय अशा वागणुकीचं समर्थन करू शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like