हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद सोपविण्याचे निश्चित झाल्याच बोललं जातं आहे. वृत्तानूसार, राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरला. त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राहुल गांधी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या बैठकीला काँग्रेसचे 23 नाराज नेते उपस्थित आहेत. या पैकी एकाही नेत्याने राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास विरोध केला नाही. त्यामुळे राहुल यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. तसेच आजच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याने नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यात सोनिया गांधी यांना यश आल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
सुरजेवाला काय म्हणाले होते?
सोनिया गांधींसोबत काँग्रेसच्या नाराज नेत्यांची बैठक होण्याच्या काही तास आधीच राहुल गांधी हेच पक्षाध्यक्ष व्हावेत असं 99.9 टक्के काँग्रेस नेत्यांना वाटतं, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं होतं. सोनिया गांधींसोबत चर्चेला येणाऱ्या नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी सुरजेवाला यांनी हे विधान केल्याचं बोललं जात होतं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला या नेत्यांकडून विरोध होऊ नये आणि पक्षाध्यक्षपदासाठी गैरगांधी नाव पुढे येऊ नये म्हणून सुरजेवाला यांनी ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत राहुल यांच्या नेतृत्वाचा विषय आल्यावर त्याला या 22 नेत्यांनी विरोध केला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या बैठकीला राज्यसभा विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार मनिष तिवारी, विवेक तंखा, शशी थरूर, कमलनाथ, पी. चिदंबरम हे नेते या बैठकीला उपस्थित होते. सोनिया गांधी यांचे विश्वासू ए. के. अँटनी, अंबिका सोनी, अशोक गेहलोत, हरिष रावत हे नेतेही या बैठकीत होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’