वायनाड (केरळ) वृत्तसंस्था / काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी ११.३० वाजल्याच्या दरम्यान केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राहुल गांधीसोबत काँग्रेसचे दिग्गज नेतेमंडळी आणि त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी हजार होत्या.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख असल्याने राहुल गांधी यांनी सकाळीच आपला अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी रोड शो करणार होते. काँग्रसतर्फे करण्यात येणाऱ्या शक्तिप्रदर्शनासाठी वायनाडच्या काँग्रेस भवन परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या अमेठी सोबतच केरळच्या वायनाड मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे. राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामुळे येथील जनता काई कौल देते ही पाहावे लागेल. मात्र स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांनी वायनाड येथे अर्ज भरल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
इतर महत्वाचे –
अर्ज भरलेल्या उमेदवाराला डावलून भाजपने जळगावात दिला नवा उमेदवार
राहुल गांधी यांची नागपुरात आज जाहीर सभा…
खासदार संजय पाटील परराष्ट्र मंत्री असते तर देश विकून खाल्ला असता