स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकपदी राहुल घार्गे यांची निवड

पुसेसावळी | स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकपदी महाराष्ट्रामधून राहुल नंदकुमार घार्गे यांची एकमेव निवड झालेली आहे. या निवडीबद्दल वडगाव (ज. स्वा) येथे जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

वडगाव (ज.स्वा.) ता. खटाव येथील राहुल घार्गे ‌यांच्या सत्कार सभारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी अविनाश फडतरे, भिमराव घोडके डॉ.माळी सातारा, जयसिंग जाधव ,दिनकर भुजबळ, संभाजी थोरात, डॉ. नष्टे, अमोल कदम, बाळू थोरात, नंदकुमार घार्गे, महेश घार्गे, दिनकर फाटक, अनिल पवार,‌ दादासो घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.

धैर्यशील कदम म्हणाले, कष्ट, जिद्द, चिकाटी या‌ गुणांचे कौतुक केले पाहिजे. एक चांगला समाज घडण्याविण्यासाठी राहुल घार्गे व अविनाश फडतरे यांच्या सारखे अधिकारी ग्रामीण भागातून घडले पाहिजेत. वडगावच्या शिरपेचात आणखी एक हिरा चमकल्याने ही गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. यावेळी चंद्रकांत घार्गे, विकास घार्गे, इस्माईल संदे, ऋषीकेश घार्गे, सुनिल घार्गे, निवास शिंदे, संजय पिसाळ,युवराज घार्गे, प्रकाश सोराटे ,प्राचार्य श्री. ‌घाडगे, संजय घोडके शिक्षक वर्ग, वडगाव व परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.