औरंगाबादेत ड्रग्जच्या साठ्यावर छापा; हजारोंची औषधी जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मुंबईतील ड्रग्जचे प्रकरण राज्यभर गाजत असताना आता शहरातही अवैधरित्या गुंगीकारक औषधी आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आणणाऱ्या एकाला सिटी चौक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मानवी शरीरासाठी अपायकारक औषधी जप्त करण्यात आली आहेत. शहरातील लेबर कॉलनी परिसरातील विश्वास नगरात पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांना गुप्त बातमीदारामार्फत लेबर कॉलनीत अवैधरित्या गुंगीचे औषध विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या कॉलनीत एक इसम गुंगीकारक आणि मानवी शरीरासाठी घातक नशेच्या औषधी सिरप व गोळ्यांचा साठा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना देण्यात आली. गुप्त बातमीदारानी दिलेल्या माहितीनुसार, लेबर कॉलनीत पोलिसांच्या पथकाने छापा मारला. लेबर कॉलनीतील विश्वास नगर येथील एस कृष्णराव यांच्या घरात राहणाऱ्या इसमाची झडती घेण्यात आली. या झडतीत औषधी सिरपच्या बॉटल व गोळ्यांच्या स्ट्रीप आढळून आल्या. सदर इसमाला या औषधी साठ्याचे बिल आहे का, अशी विचारणा केली असता, त्याने नाही, असे सांगितले. दरम्यान अवैधरित्या गुंगीकारक व नशेखोरीसाठीची औषधी बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतले आहे. सदर इसमाचे नाव अरबाज ऊर्फ गुड्डू गणी देशमुख (27) असे आहे. त्याच्यावर सिटी चौक पोलिस स्टेशनमधछ्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत कॉवर नावाचे सिरप, व ई स्कफ सिरपच्या एकूण 61 बाटल्या, तसेच अलप्रासेफ गोळ्यांच्या 12 स्ट्रीप आढळून आल्या. या सर्व औषधींची एकूण किंमत 7822.00 रुपये एवढी असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात आणखी कुणाचा हात आहे, यासंबंधीचा तपास पोलीस उपनिरिक्षक कल्याण चाबुकस्वार व पोलीस असिस्टंट शेळके करत आहेत.

Leave a Comment