नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने (Indian Railways) होळीसाठी 100 हून अधिक फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन (Festival Special Trains) सुरु करण्याची घोषणा केली आहे. यापैकी जास्तीत जास्त 54 गाड्या उत्तर रेल्वेकडून (Northern Railway) चालविण्यात येतील. या गाड्या 10 एप्रिल 2021 पर्यंत चालविण्यात येतील. होळी उत्सवाच्या (Holi Festival) निमित्ताने या गाड्या लोकांची गर्दी होण्यापासून रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलय आहे जेणेकरुन कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखता येईल. या व्यतिरिक्त भारतीय रेल्वेनेही रेल्वे प्रवासासाठी अनेक कडक नियम बनवले आहेत, जे त्यांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
सामान्य गाड्यांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील
रेल्वेने सांगितले की, “होळीच्या उत्सवासाठी चालणाऱ्या काही फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनही या क्षणी धावत आहेत. वास्तविक, दिवाळीच्या काळात धावणाऱ्या काही फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन जास्त मागणी असल्यामुळे थांबविण्यात आलेल्या नव्हत्या. तर या गाड्या अजूनही सुरूच आहेत. उत्तर रेल्वे अजूनही अशा 36 गाड्या चालवीत आहेत. विशेष म्हणजे या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन मध्ये प्रवाशांना 30 टक्के अधिक भाडे द्यावे लागते. वास्तविक, हा आदेश सन 2015 मध्येच जारी करण्यात आला होता, त्यानुसार या स्पेशल गाड्यांसाठी सामान्य गाड्यांपेक्षा 30 टक्के अधिक भाडे द्यावे लागत आहे.
सर्व गाड्या 10 एप्रिलपर्यंत रुळावर उतरवण्याचे नियोजन आहे
रेल्वे 10 एप्रिलपर्यंत त्यांच्या अनेक जुन्या गाड्यांना पुन्हा ट्रॅकवर आणण्याच्या योजनेवर काम करत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना लवकरच रेल्वेकडून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, सध्या या सर्व गाड्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम (NDMA) अंतर्गत चालवल्या जातील. अशा परिस्थितीत प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करताना कोरोना विषाणूपासून बचावा संबंधी सर्व सूचना आणि खबरदारी यांचे पालन करावे लागेल. सध्या रेल्वेच्या सुमारे 1,100 मेल एक्स्प्रेस गाड्या स्पेशल गाड्या म्हणून चालवल्या जात आहेत. त्याच वेळी, पश्चिम रेल्वेने अहमदाबाद विभागातील ध्रांगध्र्या-सखियाली विभागातील नॉन इंटरलॉकिंगचे काम न केल्याने पश्चिम रेल्वेमार्गावरून सुटणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना रद्द किंवा अन्यत्र वळविण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group