मराठवाड्यातील रेल्वे राज्यमंत्री असताना मनमाड-परभणी दुहेकरीकरणाला रेल्वे बोर्डाचे ‘रेड सिग्नल’

0
73
railway line
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्यातील महत्त्वाचा रेल्वे मार्ग असलेल्या परभणी-मनमाड या रेल्वे मार्गाचा संपूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे हास्यास्पद कारण देत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या मार्गाचे दुहेरीकरण करण्यास नकार दिला आहे. तर औरंगाबाद ते अंकाई या मार्गाचे दुहेरीकरण करण्यासंबंधीचे सर्वे करणार असल्याचा गाजर त्यांनी दाखवला. मनमाड-परभणी दुहेरीकरण याबाबत नांदेड चे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे हे केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहेत, असे असतानाही या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आला नकार मिळणे दुर्दैवी असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे दिवसभरात केवळ सहा ते सात रेल्वे गाड्या धावणाऱ्या परळी-विकाराबाद आणि लातूर रोड ते कुर्डूवाडी मार्गाचे दुहेरीकरण करण्याची शिफारस करून प्रत्यक्षात दुहेरी करण्याचे काम देखील सुरु झाले आहे. या दोन्ही मार्गांवर परभणी मनमाड मार्गापेक्षा 25 ते 40 टक्‍क्‍यांपेक्षा कमी रेल्वे धावत असताना आणि निम्म्यापेक्षा कमी वापर होताना देखील दुहेरीकरण करण्यास महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे रेल्वे बोर्ड खोटी माहिती देऊन दक्षिण मध्य रेल्वे मराठवाड्याला पुन्हा एकदा सावत्र वागणूक देत असल्याचे समोर आले आहे.

परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण याबाबत नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संसदेत रेल्वेमंत्र्यांना काही प्रश्न विचारले होते. याला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, दुहेरीकरण हे त्या मार्गाचा वापर यावर आम्ही ठरवतो सध्या परभणी मनमाड या 291 किमी मार्गाचा वापर पूर्ण क्षमतेने होत नसल्याने त्याचा विचार आम्ही केला नाही. भविष्यात या मार्गावर ट्राफिक वाढल्यास दुहेरीकरण करण्याचा विचार करू तर अंकाई ते औरंगाबाद 98 किमीचा मार्ग दुहेरीकरण करण्याच्या उद्देशाने या मार्गाचे सर्वेक्षण करू, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here