औरंगाबाद | मराठवाडा आणि औरंगाबादेतील रेल्वे विकास याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी 15 आणि 16 मार्च रोजी औरंगाबाद अहमदनगर दरम्यान 115 किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग करण्याची मागणी केली होती. याबाबत फेरविचार करून केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
औरंगाबाद अहमदनगर या मार्गावर रेल्वेसाठी नवीन मार्ग तयार करण्यासाठी सर्वेक्षण करून औरंगाबाद येथील आधुनिक रेल्वे स्थानकासाठी मान्यता द्यावी, त्याचबरोबर औरंगाबाद चाळीसगाव रेल्वे मार्ग तयार करून औरंगाबादला पुण्याशी जोडावे. दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाला मराठवाड्यातील रेल्वेच्या विकास कामासाठी वाढीव निधी देण्यात यावा, अशा मागण्या खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केल्या होत्या.
इम्तियाज जलील यांनी सादर केलेल्या मागण्यांची दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सर्व कामांचे अहवाल सादर करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.