हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Railway News । महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडणारी आणि कोकणच्या निसर्गरम्य वातावरणातून धावणाऱ्या उधना ते मंगळूर ट्रेनला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. खरं तर उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हि द्वीस्वाप्ताहिक रेल्वे सुरु करण्यात आली होती. आता या ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणी माणसाला तसेच उधना वरून मंगळूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कधीपर्यंत मुदतवाढ ? Railway News
उधना ते मंगळूरु (09057/09058) या विशेष द्वीस्वाप्ताहिक रेल्वेला २८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत गाडी क्रमांक 09057 म्हणजे उधना-मंगळूरू आठवड्यातील दर बुधवार आणि रविवारी रात्री 8 वाजता उधना जंक्शनहून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री पावणेआठ वाजता ही गाडी मंगळूरू जंक्शनला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 09058 म्हणजे मंगळूरू-उधना आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी रात्री १०:१० वाजता मंगळुरु जंक्शनहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी ही ट्रेन सुरत येथील उधना जंक्शनला पोहोचणार आहे. (Railway News)
उधना ते मंगळूर ट्रेनला (Udhna to Mangaluru Train) मुदतवाढ देण्यात आल्याने गणेशोत्सवला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे .. तसेच उधना, सुरत आणि त्या आसपासच्या परिसरातून कोकणासह मंगळुरू आणि कर्नाटकच्या इतर भागांत जाणाऱ्या तसेच मंगळुरू येथून उत्तर दिशेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावरील पर्यटक, व्यावसायिक, विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची सुविधा आहे.
कोणकोणत्या स्टेशनवर थांबा ?
हि विशेष ट्रेन (Railway News)उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा , माणगाव , खेड़, चिपळूण, सावर्डा, संगमेशवर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, कर्माली, मडगाव जंक्शन, कानकोना, करवार, अंकाळा, गोकर्णा रोड, कुम्टा, मुर्देश्व,र भटकल मूकांबिक रोड (ब्यंदूर) कुंडापुर, उदुपी, मुलकी, सुरथ्कल, मगंलूरू जंक्शन या स्थानकांवर थांबू शकते.




