Railway Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. रेल्वे विभागाकडून भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या तरुणांना केंद्र शासनाची नोकरी करायची आहे, त्यांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 8 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. रेल्वे विभाग या भरती प्रक्रियेअंतर्गत तब्बल 9 हजार तरुणांना नोकरीची संधी देईल. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता तरुणांनी या भरतीसाठी अर्ज करावा. तसेच अर्जाविषयीची सविस्तर माहिती पुढे वाचावी.
निवडणुकीच्या काळामध्ये रेल्वे विभागाकडून तब्बल 9000 पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या अर्जाची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 अशी आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांना या तारखेच्या आतच अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे दहावी पास असलेले मार्कशीट असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे.
कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू? (Railway Recruitment 2024)
ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाच्या टेक्नीशियन पदांसाठी राबवण्यात येत आहे. त्यामुळे 18 ते 33 वयापर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर परीक्षेच्या मार्फत त्याची निवड करण्यात येईल. यानंतर कागदपत्राची तपासणी केली होईल. पुढे उमेदवाराचे मेडिकल चेकअप करण्यात येईल आणि त्याला नोकरीवर रुजू केले जाईल. परंतु यासाठी तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच 8 मार्चपर्यंत अर्ज करणे आवश्यक असेल.
अर्ज कोठे आणि कसा करावा?
इच्छुक उमेदवारांना https://indianrailways.gov.in/railwayboard/ या वेबसाईटवर जाऊन पदाविषयी सर्व माहिती जाणून घेता येईल. तसेच भरती प्रक्रियेसाठी अर्ज कोठे करायचा हे देखील समजेल. महत्वाचे म्हणजे, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांना पाचशे रुपये फी भरावी लागणार आहे. तसेच, प्रवर्गातील उमेदवारांना फक्त 250 रुपये फी भरावी लागेल. (Railway Recruitment 2024) या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने कोणतीही खोटी माहिती भरू नये, तसे केल्यास रेल्वे विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते.