हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासाचे उत्तम साधन आहे. खास करून लांबच्या पल्ल्यासाठी नेहमीच रेल्वेने प्रवास केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळे विस्तारलं असून कुठूनही कोणत्याही भागात जाणे शक्य आहे, त्यामुळे दररोज करोडो प्रवाशी ट्रेनने प्रवास करत असतात. . रेल्वे प्रवास सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सातत्याने नवनवीन गोष्टी आणत असते. आताही इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने अशी एक सुविधा आणली आहे ज्यामाध्यमातून तुम्ही तुमच्या एका आवाजाने किंवा थेट कॉल करून रेल्वे तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) करू शकता , रद्द करू शकता किंवा PNR स्टेट्स चेक सुद्धा करू शकता. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
सुविधा वेगवेगळ्या भाषेत – Railway Ticket Booking
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) लोकांना आवाजाद्वारे ट्रेन तिकीट बुक करण्याची सुविधा सुरु केली आहे. IRCTC, NPCI आणि CoRover ने UPI साठी संभाषणात्मक व्हॉइस पेमेंट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवासी केवळ व्हाईसच्या माध्यमातून किंवा थेट कॉल करून तिकीट बुक करू शकता. रेल्वेची नवीन सुविधा पेमेंट गेटवेशी जोडलेली आहे ज्याच्या मदतीने लोकांना त्यांचा आवाज वापरून किंवा कॉलवर त्यांचा UPI आयडी किंवा मोबाइल नंबर टाइप करून तिकीट बुकिंग आणि पेमेंट करण्याची सुविधा मिळेल. हि सुविधा वेगवेगळ्या भाषेत देण्यात आली असल्याने प्रवाशांचे काम सोप्प होतंय. खास बाब म्हणजे यामुळे आता पेमेंट सुद्धा अशाच प्रकारे करता येणार आहे. प्रवाशी क्रेडिट/डेबिट कार्ड, नेटबँकिंग आणि वॉलेट यासारख्या विविध पेमेंटचा वापर करू शकतात. पैसे भरल्यानंतर तिकीट बुक केले जाते. हे सर्व काम भारतीय रेल्वेसाठी AI व्हर्च्युअल असिस्टंट Askdisha द्वारे केले जाईल.
“UPI वापरून व्यापाऱ्यांना पेमेंट करणारी ही पहिली संभाषणात्मक व्हॉइस पेमेंट सिस्टम आहे. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की व्हॉइस पेमेंटचा अर्थ असा नाही की तो तुमचा UPI पिन आपोआप टाकेल. उलट, याचा अर्थ असा आहे की ते तुम्हाला थेट पेमेंट गेटवेवर घेऊन जाईल जेणेकरून तुम्हाला तुमचा UPI आयडी पुन्हा पुन्हा टाकण्याची गरज भासणार नाही. रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी आणि जलद आहे. तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) व्यतिरिक्त, तुम्ही पीएनआर स्टेटस तपासू शकता, तिकीट रद्द करू शकता, रिफंड घेऊ शकता, बोर्डिंग स्टेशन बदलू शकता, बुकिंग इतिहास तपासू शकता.