हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Railway Tickets on EMI । तुम्ही आत्तापर्यंत नवीन कार किंवा नवीन घराचा EMI भरला असेल… कधी कधी तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप EMI च्या हप्त्यावर खरेदी केला असेल. परंतु आता EMI च्या माध्यमातून संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करता येणार आहे. होय, तुम्ही जे वाचताय ते १०० % खरं आहे. IRCTC ने एक खास असं टूर पॅकेज लाँच केलं आहे. ज्या माध्यमातून तुम्ही EMI वर रेल्वेचे तिकीट खरेदी करू शकता. म्हणजेच काय तर रेल्वे ट्रेन तिकिटाचे भाडे EMI मध्ये म्हणजेच हप्त्यांमध्ये भरू शकता.
प्रवास होणार सोप्पा – Railway Tickets on EMI
लोकांचा प्रवास सोपा करण्यासाठी रेल्वेने गेल्या काही दिवसांत अनेक बदल केले आहेत. वेटिंग तिकिटांचे बुकिंग, आरक्षण शुल्क, रेल्वे तिकिट आरक्षणासाठी तत्काळ तिकिटांमध्ये बदल केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता रेल्वेने EMI च्या माध्यमातुन प्रवास करण्याची संधी आपल्या प्रवाशांना दिली आहे. खरं तर असे अनेक प्रवासी असतात ज्यांना रेल्वेने विशेष देवदर्शनाला किंवा कोणत्या तरी ठिकाणी पर्यटनाला जायचं असते, परंतु खिशात पैसे नसल्याने या प्रवाशांची इच्छा अपुरीच राहते. आता अशा प्रवाशांना हप्त्यावर तिकीट भरून प्रवास (Railway Tickets on EMI) करता येणार आहे.
मात्र ही ऑफर देशातील सर्वच ट्रेन साठी नाही, तर IRCTC च्या भारत गौरव ट्रेनसाठीच आहे. रेल्वेकडून देशातील प्रसिद्ध तिर्थस्थळांना भेट देण्यासाठी हि भारत गौरव ट्रेन सूर करण्यात आली आहे. या रेल्वे गाड्यांमध्ये तिकिटे बुक करताना तुम्ही EMI चा पर्याय निवडू शकता. समजा तुम्ही १३ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान धावणाऱ्या भारत गौरव ट्रेनमध्ये तिकीट बुक केले आहे. या ट्रेनचे इकॉनॉमी क्लासचे भाडे प्रति व्यक्ती १८४६० रुपये आहे. यामध्ये तुमचे स्लीपर क्लास ट्रेनचे तिकीट आणि हॉटेलमध्ये राहण्याचा समावेश आहे. थर्ड एसी कोचचे भाडे प्रति व्यक्ती ३०४८० रुपये आहे. त्याचप्रमाणे, कम्फर्ट कॅटेगरीचे भाडे ४०३०० रुपये आहे. अर्थात, हे मोठे भाडे भरण्यात अडचण येऊ शकते, म्हणून रेल्वेने EMI ची सुविधा उपलब्ध केली आहे. (Railway Tickets on EMI) तुम्ही ट्रेनचे टूर पॅकेज सहज बुक करू शकता आणि प्रवास झाल्यानंतर हप्त्याने तिकीटाचे पैसे हळू हळू भरू शकता.
त्यासाठी IRCTC ने अनेक सरकारी आणि खासगी बँकांशी करार केला आहे. तुम्ही IRCTC वेबसाइटद्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करू शकता. तिकीट भरताना, तुम्हाला EMI पर्याय निवडावा लागेल. हे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर देण्यात येईल.