औरंगाबाद | शहरामधील मुख्य चौक असलेल्या औरंगपुरा भागातील पाणी साठल्यामुळे काही युवकांनी साठलेल्या पाण्यामध्ये जाऊन पाण्याचा आनंद घेत होते. तर दुसरीकडे गुडघ्याइतके पाणी तुंबल्याने चारचाकी वाहनाने देखील पूर्णपणे पाण्यामध्ये अडकली होती. अचानक आलेल्या पावसाने महिनाभरापासून बंद असलेली दुकानांमध्ये पाणी शिरले.
राज्यामध्ये एक महिनाभरापासून लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. आवश्यक असेल असेच दुकानात चालू आहे. मेडिकल असतील भाजीपाल्याचे दुकान असतील याच दुकानाला परवानगी देण्यात आलेली आहे. आता असा प्रश्न उद्भवत आहे की जे दुकान महिनाभरापासून बंद आहे. त्या दुकानात पाणी गेल्या आल्याने दुकानात पाणी शिरल्याने दुकान व्यवसायिक अडचणीत सापडलेला आहे. एकीकडे लॉकडाऊन सुरु आहे.
दुसरीकडे पाऊस आहे तर दुकानात पाणी शिरले काही वस्तूचे नुकसान झाले तर आता याला जबाबदार कोण. झालेल्या नुकसानाची भरपाई करून देणार कोण असा सवाल आता दुकान चालकांना पडलेला आहे.