Rain In Maharashtra : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

Rain In Maharashtra 20 may
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rain In Maharashtra। राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मागील २-३ दिवसापासून राज्यातील जवळपास सर्वच भागात पावसाच्या सऱ्या कोसळत आहेत. आज २० मे रोजीही पावसाची बॅटिंग अशीच सुरु राहणार असून कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे, विजांचा कडकडाट सह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला असून नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २२ मे रोजी अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे हवामानीय क्षेत्र उत्तरेकडे सरकत असताना त्याची तीव्रता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होऊन पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर असलेल्या मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता (Rain In Maharashtra) आहे.

मराठवाडा विदर्भात कस असेल वातावरण – Rain In Maharashtra

दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या सऱ्या कोसळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट आहे. या जिल्ह्यात वेगवान वार आणि गारपीठ पडण्याची शक्यता आहे. हवामानाच्या या बदलामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हि थोडीफार चिंतेची बाब आहे.