हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काहीच दिवस उरले असून, तत्पूर्वी मान्सूनच्या पावसाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 2025 मध्ये मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता जागतिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाऊसाचे प्रमाण चांगले असेल तर कृषी उत्पादनात वाढ होऊन बाजारात सकारात्मक बदल दिसून येतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते .त्यामुळे हि बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरणार आहे. कारण भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे येथील अनेक लोक शेतीवर अवलंबून असतात आणि शेती हि पावसावर अवलंबून असते.
ला निना आणि अल निनो यांचा प्रभाव –
जागतिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ला निना सक्रिय होण्याची 55 टक्क्यांपेक्षा जास्त शक्यता आहे. ला निना आणि अल निनो हे दोन्ही वाऱ्यांचे प्रकार असून त्यांचा थेट परिणाम भारतातील मान्सून पावसावर होताना दिसतो. जर ला निना सक्रिय झाला तर भारतात चांगला पाऊस पडतो, कधीकधी सरासरीपेक्षा जास्त पडतो . तर याउलट अल निनो सक्रिय झाल्यास पावसाचं प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे या वाऱ्यावर पावसाचे प्रमाण अवलंबून असते.
अंदाजाचा सर्वात जास्त फायदा कृषी क्षेत्रासाठी –
जर महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर , जागतिक हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, तर जूनपर्यंत परिस्थिती अशीच राहिली तर राज्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजाचा सर्वात जास्त फायदा कृषी क्षेत्रासाठी होणार आहे. ज्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होईल आणि बाजारात उत्साह निर्माण होईल. त्यामुळे येणारे नवीन वर्ष शेतकरी आणि इतर लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे.