कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे आज शुक्रवारी धरणात 87.60 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 49 हजार 524 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तर आज शुक्रवारी दि. 12 रोजी सकाळी 10 वाजता धरणाच्या सहाही दरवाजे उचलून 8000 क्युसेस पाणी मुख्य दरवाजातून सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता कोयना नदीपात्रात 10 हजार 100 क्युसेस पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे.
आज दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8:00 वाजता धरणाची पाणी पातळी 2149 फूट 00 इंच झाली असून धरणामध्ये 87. 60 TMC (83.23%) पाणीसाठा झाला आहे. मागील 24 तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये 4.10 TMC इतकी वाढ झाली आहे.
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदीकाठी सावधानतेचा इशारा @HelloMaharashtr @AurangabadHello pic.twitter.com/llgWWH1l2A
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) August 12, 2022
आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फुट 6 इंच उचलण्यात आले आहेत. सहा दरवाजातून 8000 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना क्षेत्रात 200, नवजा 128 तर महाबळेश्वर येथे 297 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.