हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील वर्षी अनेक भागांमध्ये खूप कमी पाऊस झाला. यामुळे अनेक भागातील लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागले. रब्बी पिकावरही या पावसाचा परिणाम झाला होता. पावसाळ्यानंतर विहिरी आणि नदीचे पाणी आटल्यानंतर पिण्याचा पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार या यावर्षी मात्र भरभरून पाऊस (Rain Update) पडणार आहे. आशिया पॅसिफिक इकॉनोमिक कोऑपरेशन या संस्थेने काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे सांगितलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे.
‘ला निना’ची परिस्थिती | Rain Update
मागील वर्षी कमी पाऊस पडला. कारण मागील वर्षी पावसावर याचा परिणाम झालेला होता. आता ला निनाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे संकेत देखील मिळालेले आहे. यावेळी ‘ला निना’ची परिस्थिती असेल तर पाऊस चांगला होतो. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान केंद्राने वर्तवलेला आहे.
स्कायमेटचा अंदाज
स्कायमेटने म्हटल्याप्रमाणे यावर्षी देशभरात सामान्य स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेचा हा दुसरा अंदाज आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, सुरुवातीला पावसाचा प्रभाव कमी असणार आहे. परंतु जून ते सप्टेंबर या चार महिन्यात भरपूर पाऊस पडणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात दक्षिण भारतासह मध्य भारतात देखील जास्त पाऊस पडणार आहे.
चार महिन्यात पावसाची शक्यता
जून
50% सामान्य पावसाची शक्यता
20% सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता
30% सामान्य रिक्षा कमी पावसाची शक्यता
जुलै
60 % पाऊस सामान्य पावसाची शक्यता
20% सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता
20% सामान्य पेक्षा कमी पावसाची शक्यता
ऑगस्ट
50% सामान्य पावसाची शक्यता
20% सामान्य पेक्षा जास्त व्यवसायाची शक्यता
30 % सामान्य पेक्षा कमी पावसाची शक्यता
सप्टेंबर
60 % सामान्य पावसाची शक्यता
20% सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता
20% सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता.