हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raisins Benefits) लाडू असो किंवा खीर मनुक्याशिवाय ते अपूर्णच वाटतात. मनुका म्हणजे काय तर वाळलेली द्राक्षे. जी द्राक्ष्यापेक्षा आकाराने लहान असतात. पण चवीला त्याला काही तोड नाही. मनुका हा नैसर्गिकरित्या आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करण्याची क्षमता ठेवतो. मनुका हा असा पदार्थ आहे ज्यामध्ये विविध प्रकार आढळून येतात आणि यातील प्रत्येक प्रकार हा आपल्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांसाठी उपायकारक आहेत. यातील बऱ्याच मनुकांविषयी आपल्याला माहितसुद्धा असेल. पण तरीही दैनंदिन जीवनात त्याचा वापर केला जात नाही.
अगदी पोटाच्या समस्यांपासून ते मधुमेहाच्या समस्यांपर्यंत मनुका हा लाभदायी मानला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्ससोबत मनुक्याचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. चला तर जाणून घेऊयात मनुक्यातील पोषक तत्व, मनुक्याचे प्रकार आणि कोणकोणत्या आरोग्यविषयक समस्यांसाठी मनुका फायदेशीर ठरतो?
मनुक्यात कोणकोणते पोषक घटक असतात?
मनुका खाण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. पण ते फायदे कशामुळे होतात याविषयी फार कमी लोकांना ठाऊक आहे. तर मनुक्यात अनेक विविध प्रकारचे पोषक घटक असतात. (Raisins Benefits) जे आपल्या शरीरातील व्याधींना दूर करण्यास मदत करतात. मनुक्यात फायबर, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक, अँटिऑक्सिडेंट, दाहक-विरोधी गुणधर्म, खनिजे, अँथोसायनिन्स आणि अनेक जीवनसत्त्व समाविष्ट असतात. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांमध्ये मनुका खाणे लाभदायी आहे.
मनुक्याचे प्रकार आणि त्याचे फायदे (Raisins Benefits)
1) काळा मनुका – काळी द्राक्ष सुकवल्यानंतर त्यापासून काळा मनुका तयार होतो. सुकल्यानंतर त्याचा रंग अधिक गडद दिसतो. काळे मनुके नियमित खाल्ल्याने पचन शक्ती वाढते. कारण काळे मनुके आतडे स्वच्छ करतात. तसेच केसगळती थांबते आणि त्वचेचे आरोग्य देखील सुधारते.
2) पिवळा मनुका – पिवळा मनुका हा मधुमेहींच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. कारण या मनुक्यात रक्तातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता असते. शिवाय जळजळ कमी करणारे घटक देखील समाविष्ट असतात.
3) लाल मनुका – लाल द्राक्षांपासून तयार होणारा लाल मनुका हा चवीला अतिशय स्वादिष्ट असतो. लाल मनुकेदेखील मधुमेहाचा धोका कमी करण्यात मदत करतात. शिवाय लाल मनुक्यांचे सेवन दातांची झीज थांबवतात. (Raisins Benefits)
4) हिरव्या मनुका – हिरव्या द्राक्षापासून तयार होणारा हिरवा मनुका फार पातळ असतो. मात्र आकाराने लांब असतो. या मनुक्यात भरपूर फायबर आणि पोषक तत्व असतात. जे हृदयासाठी फायदेशीर आणि ॲनिमियाला प्रतिबंध करू शकतात.
आरोग्यदायी फायद्यांसाठी दिवसातून किती मनुका खावे?
तज्ञ सांगतात की, मनुक्यांचे सेवन हे आरोग्यासाठी एकप्रकारे वरदान आहे. त्यामुळे नियमित आपल्या आहारात मनुक्याचं समावेश करायला हरकत नाही. मात्र त्याचे प्रमाण हे निश्चित असावे. (Raisins Benefits) यानुसार, आपण रोजच्या आहारात ८० ते ९० ग्रॅम मनुका म्हणजेच अर्धा कप मनुका खाऊ शकतो.