राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊत स्पष्टच बोलले..

0
3
Sanjya Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकाच कुटुंबातील नेते असले तरी राजकीय वर्तुळात दोघेजण विरुद्ध दिशेला उभे असलेले पाहायला मिळतात. मात्र एखादा कार्यक्रम असो किंवा लग्न समारंभ हे दोघेजण देखील त्यात आनंदाने एकत्र सहभागी होतात. आता पुन्हा एकदा नुकतेच एका लग्नाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पाहिला मिळाले. त्यामुळे जनमाणसांमध्ये हे दोघे एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबतच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो. अशा भेटी वारंवार घडाव्यात. मात्र, महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे. शिवसेना फोडून शिंदेंच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकऱ्यांनी हात मिळवणी करू नये. लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. शेवटी भाऊ आहे, कुटुंब आहे, लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत.”

त्याचबरोबर, “ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. शेवटी ते ठाकरे आहेत. कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे. अमित शाह आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा. हे शाह यांचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि ४० चोरांचा एक पक्ष स्थापन झाला. तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणत्या नेत्याला मिटवता येणार नाही.” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

इतकेच नव्हे तर, “आमच्यात व्यक्तीश: ही नाती आहेत, भावाचं आणि मित्रत्वाचं नातं आहे, त्यात वाद नाही. महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे. शिवसेना फोडून शिंदेंच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकऱ्यांनी हात मिळवणी करू नये. अशा शत्रूशी हात मिळवणी करणं हा महाराष्ट्रातील हुतात्म्याचा अपमान आहे” असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेकवेळा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, या दोघांचे एकत्र फोटो देखील लावण्यात आले होते, त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाले आहे.