औरंगाबाद । राज ठाकरे यांची सभा सुरु असताना भोंग्याचा आवाज आला. त्यानंतर राज यांनी सभेतच पोलिसांना ठणकावून सांगितलं. आत्ताच्या आत्ता हे भोंगे बंद करा अन्यथा महाराष्ट्रात काय होईल हे मला माहिती नाही. यांनतर काहीवेळ सभा ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मला महाराष्ट्रात दंगली घडवण्याची अजिबात इच्छा नाहीये. ही गोष्ट मुस्लिम समाजानेसुद्धा लक्षात घ्यावी. मला मागे एक मुस्लिम पत्रकार भेटला. त्यानं त्याच्या मुलाला भोंग्याचा कशा त्रास होतो ते सांगितलं. लाऊडस्पिकर हा सामाजिक विषय आहे, धार्मिक नव्हे असं राज ठाकरे यांनी म्हटले.
जर उत्तर प्रदेशातील लाऊडस्पिकर उतरू शकतात तर आपल्या महाराष्ट्रातील लाऊडस्पिकर का उतरत नाहीत. किती मशिदींकडे लाउड्स्पिकरचे परवानगे आहेत? असा सवाल उपस्थित करत राज यांनी भोंग्याबाबत आपला आक्रमक पवित्र घेतला.
सगळ्या देशामधील भोंगे उतरवायला पाहिजेत. आज १ तारीख आहे. उद्या २ तारीख आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणामध्ये मला विष कालवयचं नाही. पण त्यानंतर आम्ही ऐकणार नाही. त्यानंतर जिथं जिथं लाऊडस्पिकर लागले असतील तिथं तिथं दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजलीच पाहिजे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/5101908236568091/