….म्हणून शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंना त्रास देण्यात सुरुवात केली; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. ज्या बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज घराघरात पोचले त्यांना शरद पवारांनी त्रास द्यायला सुरुवात केली कारण ते ब्राह्मण होते असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

जेम्स लेन बाबासाहेब पुरंदरे यांना भेटला नाही हे तुम्ही लोकांना का सांगितलं नाही असा सवाल राज ठाकरे यांनी शरद पवारांना केला. तुम्ही जर सत्यवादी होता तर केंद्रात सत्ता असताना तुम्ही जेम्स लेन्स ला का भारतात फरकटत आणले नाही असेही राज ठाकरेंनी विचारले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या यु ट्यूब वर जाऊन बघा, शिवाजी महाराजांचे नाव कधीही शरद पवारांनी घेतलं नाही. मी त्या दिवशी म्हंटल की शरद पवार नास्तिक आहेत तर त्यांना लगेच झोंबल… मग त्यांनी देवाची पूजा करतांनाचा फोटो सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. पण खरं तर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत म्हंटल होत की माझे वडील नास्तिक आहेत यापेक्षा अजून काय मोठा पुरावा पाहिजे अस म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून राज्यात जातीजातीचे राजकारण निर्माण झालं. जाती जाती मध्ये द्वेष निर्माण झाला असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला. शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास द्यायला सुरुवात केली कारण ते ब्राह्मण आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केला.