खरे वारसदार राज ठाकरेच ; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही” : संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन दादर येथील महापौर निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र कार्यक्रमापूर्वीच यावरून वादंग निर्माण झालं आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हंटल आहे कि, ‘स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत. हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची आहे. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही.’

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम रखडलं होतं, त्यांच्या स्मारकासाठी मुंबईच्या महापौराचं निवासस्थान ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र याठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका पार पडतात, स्मारक अद्याप झालं नाही, शिवसेनेची सत्ता येऊनही काम रखडलं आहे, शिवसेनेला महापौर बंगला बळकवायचा होता अशी टीका सातत्याने मनसेकडून केली जात होती, त्यानंतर आता या स्मारकासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात आला असून आज स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन होत आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण न दिल्याचं समोर आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता, मात्र आता या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचं दिसतंय.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in