….तर बाळासाहेबांनी त्यांना 5 फूट जमिनीत गाडलं असत; शिवसेनेचा विरोधकांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आज नवव पुण्यस्मरण आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच विरोधकांवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडले. अमरावतीच्या दंगलीपासून ते गुजरात दंगल आणि त्यातून हिंदुत्व नेमकं कोणतं खरं हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील … Read more

खरे वारसदार राज ठाकरेच ; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही” : संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन दादर येथील महापौर निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र कार्यक्रमापूर्वीच यावरून वादंग निर्माण झालं आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी … Read more

देशाला भारत म्हणून नाही तर हिंदुस्थान म्हणून जगण्यासाठी शिवसेना आवश्यक- संभाजी भिडे

सांगली । “या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांनी जीवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे, तसं या या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, भारत म्हणून नाही, तर शिवसेना आवश्यक आहे” असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. “गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा … Read more

शिवसेनेला स्वाभिमानावरून पुन्हा डिवचलं; फडणवीसांनी बाळासाहेबांचा व्हिडीओ केला ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. भाजपला वेगळे पाडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्याने भाजप कडून रोज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं जात. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. फडणवीस यांनी एक व्हिडीओतून … Read more

उद्धवजी पण गारद का? फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरून टोमणा 

जळगाव । शिवसेनेचे नेते आणि सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला होता. या मुलाखतीचा टिझर राऊत यांनी एक शरद सगळे गारद असा शीर्षकाने प्रसिद्ध केला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुखांचे नाव द्यावे – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई 

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. संवर्धनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि सचिव यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. यावेळी देसाई यांनी प्रकल्प आणि पर्यटन विकासाच्या संदर्भात त्यांनी काही … Read more

एखाद्याच्या पाठीत गोड बोलून खंजीर कसा खुपसायचा हे मी ‘यांच्या’कडून शिकलो असं म्हणत भुजबळांनी शिवसेना का सोडली?

छगन भुजबळ. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील ३५ वर्षांपासून आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं नाव. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेत आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरु करणाऱ्या छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील गावागावात शिवसेना पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. असं असताना छगन भुजबळांचं शिवसेनेशी नेमकं काय बिनसलं? बाळासाहेबांना न जुमानता ते दुसऱ्या पक्षात कसे गेले? वाचा ही खास स्टोरी.

बाळासाहेबांचा कोणता नातू महाराष्ट्राचं राजकारण गाजवणार? जयंतीदिनी अमित आणि आदित्य ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या नवीन प्रवासासाठी तयार झाली आहे. याच दिवशी उद्धव ठाकरे यांचा भव्य नागरी सत्कार मुंबईतील वांद्रे येथे आयोजित केला असून यानिमित्ताने शिवसेनाही शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज झाली आ

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

सोलापूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी भाजप  आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करत असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वातील वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने वंचितमधून बाहेर पडले होते. मात्र, आता त्यांनी शिवसेना आणि आपले काही वावडे नसल्याचं म्हणले आहे तसेच ते शिवसेनेला मदत करणार असल्याचे बोलले आहे.

लक्ष्मण माने म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे हे आमच्या चळवळीचे नेते आणि माझे गुरु होते. त्यांचा मुलगा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चूक केली. मात्र, नातवंडे सुधारत असतील तर त्यांना मदत करण्याची माझी तयारी आहे.” म्हणजेच आगामी विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा साथ देणार असं म्हणत आहेत.

माने यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) सोलापुरात पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला मदत करणार असल्याचे म्हणाले.
[youtube https://www.youtube.com/watch?v=9TZnNiR7oFQ&w=560&h=315]

सोपलांना बाळासाहेब ठाकरेंनी धूळ चरायला सांगितली होती ती आम्ही चारणार ; नाराज शिवसेना नेत्यांचा पक्षासोबत असहकार

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर नाराज असणाऱ्या भाऊसाहेब आंधळकर यांनी सोपल यांच्या प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलीप सोपल यांचे काम करणार नाही असे म्हणत त्यांचा आम्ही पराभव घडवून आणणार असे म्हणले आहे. “मी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन राजकरणात आलो. शिवसेनेचा भगवा खांदयावर … Read more