Thursday, March 30, 2023

राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अचानक रद्द ; उद्या सकाळीच मुंबईला परतणार

- Advertisement -

औरंगाबाद प्रतिनिधी । मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांचा हा ते दौरा अर्धवट सोडणार आहेत. राज ठाकरेंचा हा दौरा तीन दिवसांचा होता. मात्र ते उद्या सकाळीच मुंबईत परतणार आहेत. राज यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

राज ठाकरे काल संध्याकाळी औरंगाबादला पोहोचले. ते १६ फेब्रुवारीला मुंबईला परतणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांचे कार्यक्रम ठरलेले होते. मात्र आता राज यांनी मराठवाडा दौरा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे उद्या सकाळी मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे त्यांचे उद्याचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज ठाकरे उद्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार होते. ते शिक्षकांच्या संमेलनादेखील उपस्थित राहणार होते. याशिवाय काही हिंदुत्ववादी संघटना आणि प्रतिष्ठी त व्यक्तींनादेखील भेटणार होते.

- Advertisement -

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादमध्ये आले आहेत. आज सकाळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील घेतली. निवडणुकीची रणनीती निश्चित करण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची होती. मात्र राज यांनी ही बैठक अवघ्या तासाभरातच गुंडाळली आणि आपला दौराही रद्द केला.