सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
मनसेने मशिदी वरील भोंगे काढण्यात यावे याची मागणी केली होती. या मागणीनंतर 4 मे ला एक अल्टिमेट देण्यात आला होता. त्यानुसार इतिहासात पहिल्यांदाच मशिदी वरचे भोंगे उतरले, पहाटेची आजम बंद झाल्या. दिवसभरात उच्च न्यायालयाने सांगितलेल्या नियमानुसारच कमी आवाजात आजान होऊ लागल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे जिल्हाध्यक्ष विकास पवार यांच्या सुचनेनुसार कराड उत्तर विधानसभा मतदार संघात घरोघरी जावून पत्रके वाटण्यात येत आहेत.
मनसेचे जिल्हा सचिव सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली पत्रक वाटण्याची मोहिम कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. राज ठाकरे यांनी दिलेले भोंग्या संदर्भातील पत्रक घरोघरी जाऊन वाटण्यात आजही दिली जात आहेत. या मनसेच्या उपक्रमाला लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. सागर पवार सांगतात की, मनसेच्या आंदोलनाचा परिणाम दिसू लागला आहे. काही ठिकाणी लाऊड स्पीकर वरची तुमचे आजान थांबली आहे. अद्याप जिथे आजान थांबली नाही तेथे लाऊ स्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करू.
राज्य सरकारने 28 ते 30 हजार मनसैनिकांना या मोहिमेत नोटिसा बजावल्या आणि काहींना अटक केलेली होती. या आक्रमक पावित्र्यानंतर काही ठिकाणी भोंगे बंद झाले तर काही ठिकाणी भोंगे अजूनही तसेच चालू आहेत. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र काढून त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मनसैनिकांना ठीक ठिकाणी लोकांना घरे जाऊन हे पत्र देण्यास सांगितले आहे. राज ठाकरे यांचा आदेश मानून आम्ही घरोघरी पत्रक पोहचवत असल्याचे सागर पवार यांनी सांगितले.