कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज ठाकरे यांनी गेल्या 5 ते 10 वर्षात अनेकदा राजकीय भूमिका बदलेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान “लाव रे तो व्हिडिओ” भूमिका होती. त्यांनी अनेक भूमिका बदल्या आता ते वेगळ्या भूमिकेत गेले आहेत. त्याच्या कालच्या सभेवरून एकदंर असे वाटते, त्यांची भूमिका कुणाला तरी पूरक असे काम करत आहेत. भाजपाची मुंबईतील सभा संपल्यानंतर मनसेची सभा सुरू होते, यांचा काहीतरी संबध असू शकतो. स्वतः च्या मनसेसाठी राज ठाकरे काम चालले असे वाटत नाही. ते कुणासाठी तरी पूरक काम करत आहेत, असा आरोप सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.
राज ठाकरे यांची औरंगाबाद (संभाजीनगर) येथील सभेनंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी श्री. पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महसूलात वाढ होत आहे. आता महाविकास आघाडी लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत. सत्तेच्या जवळचा मार्ग म्हणून जाती- जातीत मतभेद करण्याचे काम राज्यात सुरू झाले आहे. अशा प्रकारची राज्याला शोभणारी गोष्ट नाही. दुर्देवाने महाराष्ट्र दिनी राज्यात बुध्दीभेद करण्याचे काम चालू आहे, हे फार चुकीचे आहे.
भाजपाला सत्ता न आल्याचा राग : आ. बाळासाहेब पाटील
भारतीय जनता पक्षाला वाटत होत आपली सत्ता येणार, परंतु तसे झाले नाही. सोनिया गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता आहे. मग तो राग काढण्यासाठी आणि सत्तेवर जाता आले नाही. म्हणून राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप केला जात असून तो पूर्णपणे चुकीचा आहे, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले.