मुंबई | आधीपासून मुंबईच्या महापौरांचा जो बंगला आहे तो कुणाच्यातरी हितसंबंधासाठी बाळासाहेबांच्या नावाने गिळला जातोय. आज शिवसेनेने महापौर बंगला मागितला आहे. उद्या दुसरे कुणी राजभवन मागतील. अशा स्थानमाहात्म्य असलेल्या वास्तूंवर अधिकार सांगून सत्ताधारी चुकीचे पायंडे पाडत असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध विषयासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची गुरुवारी दुपारी महापालिकेत जाऊन भेट घेतली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित होते.
इतर महत्वाचे –
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले की बाळासाहेबांच्या भव्य स्मारकासाठी महाराष्ट्रात कुठेही, केव्हाही जागा उपलब्ध होऊ शकते. नाशिकमध्ये आम्ही साकारलेलं बाळासाहेबांचं देशातलं पहिलं स्मारक याचं उत्तम उदाहरण आहे. इतक्या बिल्डरांना भूखंड वाटले गेले परंतु बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भूखंड मिळत नाही यासारखं दुर्दैवं नाही, असे म्हणत राज यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.राज यांनी शिवसेना आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. शिवाजी पार्क जिमखान्याची जागा टेनिस आणि बॅडमिंटन खेळासाठी राखीव आहे. जिथे लोकं वर्षानुवर्षे खेळतात तिथे महापौर बंगला प्रस्तावित आहे. जिमखानाच्या खेळाच्या जागेवर महापौर बंगला होऊ देणार नाही, असे राज यावेळी म्हणाले.
आधीपासून मुंबईच्या महापौरांचा जो बंगला आहे तो कुणाच्यातरी हितसंबंधासाठी बाळासाहेबांच्या नावाने गिळला जातोय. आज शिवसेनेने महापौर बंगला मागितला आहे. उद्या दुसरे कुणी राजभवन मागतील. अशा स्थानमाहात्म्य असलेल्या वास्तूंवर अधिकार सांगून सत्ताधारी चुकीचे पायंडे पाडत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
ज्या शिवसेना प्रमुखांनी स्वतःचा महापौर त्या महापौर बंगल्यात बसावा यासाठी संघर्ष केला तिथूनच महापौर बाहेर काढला जातोय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, कोणतीही शासकीय जागा स्मारकासाठी दिली जाणार नाही. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा न मिळणे हे दुर्दैवं असल्याचे म्हणत राज यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं शहर आणि त्या शहराचा महापौर वास्तव्यासाठी वणवण भटकतोय. ही महापौरपदाची थट्टा असल्याचे ते म्हणाले.