वाशिम | सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे शहरी भागांसह दुर्गम गावांनाही भेट देत आहेत. मंगळवारी दुपारी वाशिम येथील बैठका, सभा आटोपल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेली नेतेमंडळी पोटपूजेसाठी चक्क एका ढाब्यावर गेली. आपल्या ढाब्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आल्याचे पाहून ढाबेवाला तसेच ढाब्यातील इतर मंडळीही अवाक झाली. यावेळी बाळा नांदगावकरही राज यांच्यासोबत होते.
इतर महत्वाचे
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
इंदुरीकर महाराजां बद्दल च्या या गोष्टी तुम्हाला माहीती आहेत काय?
विदर्भ दौऱ्यावर रेल्वेने रवाना झालेल्या राज यांचा दौरा साधेपणाने सुरू आहे. राजकीय-सामाजिक बैठकांसोबत राज गावक-यांसोबत संवादही साधत आहेत. तरूण-तरूणींच्या समस्याही जाणून घेत आहेत. अमरावतीतील एका दुर्गम गावात राज यांनी गावक-यांसोबत जेवण केले. दुर्गम भागातील एका शाळेला तसेच प्रबोधनकार ठाकरे यांचे वास्तव्य असलेल्या गावाला त्यांनी भेट दिली होती.
मंगळवारी वाशिम येथील बैठक आटोपल्यानंतर राज यांचा ताफा अकोल्याकडे रवाना झाला. वाटेत मालेगावजवळच्या नागरतास बायपास रोडवरील ढाब्यावर ताफा थांबला. साधे टेबल, खुर्च्या अशी रचना असलेल्या ढाब्यात राज आणि त्यांचे सहकारी बसले. भाकरी, भाजीवर ताव मारणारे राजसाहेब आणि सोबतच्या नेतेमंडळींना पाहून ढाबेवाला भारावून गेला होता.