….आणि सातव यांच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झालं. पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. अत्यंत शोकाकूल वातावरणात अनेक कार्यकर्ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमा झाले होते. तसेच काँग्रेसचे प्रमुख नेत्यांची देखील उपस्थित होती.यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

याच दरम्यान, पूजाविधी करताना राजीव सातव यांच्या पत्नींच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी राजीव सातव यांच्या चेहर्यावरुन हात फिरवत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अतिशय दुःखद असा हा प्रसंग पाहून त्यांचे नातेवाईक देखील हळहळले. राजीव सातव हे राजकीय क्षेत्रात जरी व्यस्त असले तरी ते आपल्या कुटुंबाला देखील भरपूर वेळ देत होते.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/795225121129943/

राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातून चाहत्यांनी कळमनुरी येथे सोमवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. सकाळी ८ वाजेपासून निवास्थानासमोर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कोरोना नियमांचे पालन, सामाजिक अंतर ठेवत त्यांचे हजारो चाहते, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध पक्षातील नेते येथे अंत्यदर्शनासाठी आले होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.