Rajendra Hagwane : अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माजोरडेपणा; पश्चातापाची भावना नाहीच

rajendra hagawane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Case) आत्महत्या प्रकरणातील आरोप सासरा राजेंद्र हगवणेचा माजोरडेपणा अटकेनंतरही कायम आहे. तुला पश्चात्ताप होतो का? असा सवाल एका पत्रकाराने केला असताना राजेंद्र हगवणेने (Rajendra Hagwane) नकारार्थी मान डोलावली, म्हणजेच आपल्याला कोणताही पश्चात्ताप होत नाही असच एकप्रकारे त्याने म्हंटल. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार होते. आज शुक्रवारी पहाटे पोलिसांनी या दोघांना अटक केली. मात्र अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माजोरडेपणा कायम असल्याचं दिसून आलंय. बावधन पोलीस ठाण्यात राजेंद्र आणि त्याचा मुलगा सुशील यांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी सकाळी आणलं, तेव्हा पत्रकारांनी पश्चात्ताप होतो का? असा सवाल विचारला. त्यावर नकारार्थी आणि उद्दामपणे हात हलवत राजेंद्र हगवणेने नकार दिला. त्याच्या अंगात अजूनही उद्दामपणा दिसला,…. तसेच सुनेवर केलेल्या अन्यायाबद्दल कुठेही आपलं चुकलय याची भावना राजेंद्र हगवणे याच्या चेहऱ्यावर दिसली नाही.

अटकेपूर्वी मटणावर ताव मारला –

दरम्यान, अटकेच्या आधी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी एका हॉटेलवर मटणाचा ताव मारला. त्यांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला. नाकाबंदी सुरु केली. संपूर्ण परिसरात झडती घेतली. अखेर शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामध्ये वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद आधीपासूनच अटकेत आहे. या तिघांनाही पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर आता वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दिरालाही अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या सासरे-दीरांना अटक झाल्याची बातमी समजल्यानंतर तिचे आई-वडील, कस्पटे कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले. वैष्णवीच्या सासरच्या लोकांवर मकोका लावून त्यांना कठोरात शिक्षा व्हावी अशी मागणी कस्पटे कुटुंबाने केली असून तरच आपल्या गेलेल्या मुलीला न्याय मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.