तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांची डोकेदुखी वाढवली आहे.

यादव यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मेळावा आयोजित करुन पुढील राजकिय वाटचालीबाबत विचारविमर्श केला. राजकिय फायद्यापुरते आपला वापर केला जातो अशी भावना कार्यकर्त्यांची झाली असुन आपण कराड दक्षिणमधुन निवडणुक लढवावी असा सुर निघाला असुन आठ दिवसात स्पष्ठ भुमिका मांडु अशी प्रतिक्रिया राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

या मेळाव्याला कराडमधील नगरसेवक उपस्थित होते. यादव यांनी पक्ष जाहीर केलेला नाही. अथवा कोणाला पाठींबाही दिलेला नाही. 2014 च्या निवडणकीत राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन राजेंद्र यादव उमेदवार होते शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांना पाठींबा दिला होता. राजेंद्र यादव यांना खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा मिळाल्यास कराड दक्षिणच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.

हे पण वाचा –

पृथ्वीराज चव्हाणां विरोधात भाजप कडून काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ‘जावयाला’ उमेदवारी जाहीर

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

कराड दक्षिणमध्ये भाजपचे तिकीट उदयसिंह पाटीलांना मिळाले तर ‘असं’ करणार – अतुल भोसले

राष्ट्रवादीच्या या डावपेचाने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह

कर्जत जामखेड : हा व्यक्ती अपक्ष उभारल्यास रोहित पवार निवडणूक जिंकण्याची शक्यता