कराड नगरपालिकेची पुढील सभा लोकशाही मार्गाने न झाल्यास अविश्वास ठराव आणणार – राजेंद्रसिंह यादव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यापुढील काळात नगरपालिकेच्या होणाऱ्या सभा संसदीय पद्धतीने होणार असतील तरच आम्ही सभागृहात येऊ. अन्यथा, कायदेशीरमार्गाचा अवलंब करु, असे सांगत पुढील सभा लोकशाहि मार्गाने न झाल्यास नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावा आणू, असा इशारा जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेतून दिला. कऱ्हाड नगर पालिकेत जनशक्ती आघाडीच्यावतीने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक विजय वाटेगावकर, विरोधीपक्षनेते सौरभ पाटील, हणमंत पवार, गजेंद्र कांबळे, किरण पाटील, शारदा जाधव, स्मिता हुलवान, आशा मुळे, सुप्रिया खराडे आदींची उपस्थिती होती.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, सभागृहाची परंपरा जपत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, तो आम्हाला मिळत नसल्याचे दिसत आहे. गत दोन महिन्यात उद्धभवलेल्या कोरोना सदृश्य परिस्थितीत काम करण्याऐवजी केवळ कोणाला तरी टार्गेट करून आपला नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांनी केला असल्याचा काल झालेल्या कोरोनाविषयाच्या विशेष सभेत दिसून आला. कालच्या सभेतील घडलेल्या प्रकाराबद्दल आम्हालाही लाज वाटू लागली आहे. काल सभागृहात घडलेल्या नगराध्यक्षांच्या वर्तनाचा आम्ही आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करीत आहोत. आता गावच्या विकासासाठी कोणाला आवातणे देण्याची गरज नसून प्रत्येकाने आपआपल्या परिने गावच्या विकासासाठी प्रयत्न करावे.

सौरभ पाटील म्हणाले, दोन महिन्याच्या कालावधीत शहरात उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीत नगराध्यक्षांनी पुढाकार घेणे गरजेचे होते. एखादी तरी बैठक अथवा नगरसेवकांशी चर्चा करणे आवश्यक होते. कालच्या सभेत मांडल्या गेलेल्या उपसुचनेवर चर्चा करून त्यास बहुमत मिळते की नाही, हे पाहणे गरजेचे होते. मात्र, नगराध्यक्षांनी तसे केले नाही. आम्ही मांडलेली सुचनाच ग्राह्य धरली जाईल, असे त्या म्हणाल्या. वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सुचना, म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.

विजय वाटेगावकर म्हणाले, ह्ययापुढील काळात लोकशाही पद्धतीनेच सभा होतील. कोणाचाही आवाज दाबला जाणार नाही. आम्ही पुढील काळात एखादी स्थायी समितीची सभा तसेच सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी नगराध्यक्षांकडे करणार आहोत. तसेच या सभेत संसदीय पद्धतीने कामकाज केले जावे, अशी मागणी करणार आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment