सांगली प्रतिनिधी । आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी येथील ब्रिटिशकालीन तलाव सलग तिसऱ्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलाव भरून सांडव्यातून पडणारे पाणी धबधब्यासारखे भासत आहे तर तयार झालेल्या नैसर्गिक धबधब्याकडे सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील हौशी पर्यटक आकर्षित होत आहेत. गतवर्षीही हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता यंदाही तलाव भरल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ब्रिटिश कालीन राणी व्हिक्टोरिया यांनी सुमारे 150 वर्षापूर्वी या तलावाची निर्मिती केली होती सन 2000 पासून सलग दहा वर्षे हा तलाव पाण्याविना ठणठणीत कोरडा पाहायला मिळत होता. 2019 ला अवकाळी पावसामुळे तलाव दहा वर्षातून पूर्ण क्षमतेने भरला 2020 ला ही भरला होता. यंदाही तलाव पूर्ण क्षमतेने भरून पाणी सांडव्यावरून वाहत आहे.
राजेवाडी तलावाला मोठा दगडी सांडवा आहे सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी पडत आहे.एखाद्या पर्यटन स्थळाचे रूप या तलावाला निर्माण झाले आहे.सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिक तलावावर येत असल्याने गर्दीने तलाव फुलून गेल्याचे चित्र दिसून येत आहे तर मागील वर्षीही तलावावर मोठ्या प्रमाणत नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली होती. राजेवाडी तलावाचे पात्र सातारा जिल्ह्यात येते सांडवा सांगली जिल्ह्यात येतो तर या तलावातील पाण्याचा बराचसा वापर सोलापूर जिल्ह्यातील गावांना होतो. या तलावाला उजवा व डावा असे दोन कालवे आहेत. राजेवाडी तलाव हा ब्रिटिश कालीन तलाव असल्याने या तलावाची इतिहासात नोंद असून या तलावाची वेगळीच ओळख आहे तर यंदाही हा तलाव पूर्ण भरल्याने या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेला बळीराजा मात्र सुखावलेला असून त्याच्या चेहऱ्यावर हसू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राजेवाडी लींगीवरे दिघंची पुजारवाडी पांढरेवाडी कौठुळी यासह सांगोला तालुक्यातील अनेक गावांना याचा फायदा होणार आहे. राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो होवून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने या ठिकाणी नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे. हा धबधबा पाहण्यासठी सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील हौशी पर्यटक फोटो,सेल्फी काढण्यासाठी तलावाच्या धबधब्यावर येत आहेत धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांमुळे या परिसराला पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.