मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक बॉलिवूड स्टारही याच्या कचाट्यात अडकले आहेत. मात्र आता मुंबईत अभिनेता राजकुमार राव याच्या बिल्डिंगपर्यंत कोरोणा पोहचला आहे. त्याच्या कॉम्प्लेक्समधील एकाला करोनाची लागण झाल्याची बातमी मिळाली आहे.
दरम्यान मुंबई-पुण्यात दिवसागणिक करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. रिपोर्टनुसार अंधेरीतील एका कॉम्प्लेक्समध्ये ११ वर्षीय मुलीला करोनाची लागण झाली. यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या कॉम्प्लेक्समधील सी- विंगमध्ये राहणाऱ्या एका दिग्दर्शकाच्या मुलीला करोनाची लागण झाली आहे. यानंतर बीएमसीने ए आणि बी विंग सील केली असून कॉम्प्लेक्स सॅनिटाइज करण्याचं ठरवलं आहे.
या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या लोकांना बीएमसीने अधिक सावध राहण्याचा इशारा दिला असून सर्वांना क्वारन्टिन राहण्यास सांगितले आहे. लॉकडाउनचे आणि कॉरेन्टिनचे सर्व नियम या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या लोकांना पाळावेच लागणार आहेत.
कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!#USPresident #Presumed #coronavirus #HelloMaharashtra https://t.co/mFiLmmCxPj
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020