महाराष्ट्राचा ‘बिहार’ करायचा आहे का ? – राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातला मोर्शी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाल्याची घटना काल समोर आली होती. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली.

दरम्यान, स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? तसेच पोलीस प्रशासन काय करत होते? ? असे प्रश्न उपस्थित करत शेट्टी यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.

काल सकाळच्या सुमारास आघाडीचे उमेदवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांची कार अज्ञात हल्लेखोरांनी पेटवून दिली. यावेळी गोळीबारही करण्यात आला. या हल्ल्यात देवेंद्र भुयार आणि त्यांचा चालक थोडक्यात बचावले होते. सध्या पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.