हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या इसमावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाईफेकीचं समर्थन करणं चुकीचंच आहे परंतु जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानी सारखे वागू लागले आहे असे वाटते असं शेट्टी यांनी म्हंटल आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
राजू शेट्टी काय म्हणाले आहेत?
शाईफेकीचं समर्थन करणं चुकीचंच आहे पण शाई फेकणाऱ्या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानी सारखे वागू लागले आहे असे वाटते. ३०७ म्हणजे धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न व ३५३ म्हणजे सरकारी कामात अडथळा याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे हे सरकारी काम आहे का? मग हा कायदा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ज्या सरकारने ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला त्याला जबाबदार असणाऱ्यांच्यावर ३०२ सह ही कलमे का लावण्यात आले नाहीत?, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारला विचारला आहे.
https://www.facebook.com/100044342623536/posts/pfbid037J3Rn6rDrGRNBmJBu2Kv75Zk98i8HMhihpwAzoaRD8adtCnyYaPBeN5n2aQaBFN3l/?app=fbl
दरम्यान, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या असं वादग्रस्त विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानाबाबत दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती. मात्र तरीही काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर शाईफेक करत आपला निषेध व्यक्त केला. या शाईफेकीननंतर चंद्रकांत पाटलांनी हिंमत असेल तर समोर या असं आव्हान विरोधकांना दिले आहे. तसेच महाराष्ट्रात ही झुंडशाही चालणार नाही असेही ते म्हणाले.