Rajya Lokseva Hakka Aayog | महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत भरती सुरु, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rajya Lokseva Hakka Aayog | विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची आणखी एक संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत सरकारी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगा (Rajya Lokseva Hakka Aayog) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. हे अर्ज उमेदवार ऑफलाइन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरू शकतात.

सरकारची ही भरती गट अ पदांसाठी होणार आहे. याच रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मार्च 2024 ही आहे.

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क (Rajya Lokseva Hakka Aayog)आयोग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये उमेदवार हा पदवीधर असावा. त्याचप्रमाणे त्याला संगणकाचे ज्ञान असावे. तसेच लेखन परीक्षणाचा देखील अनुभव असलेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच गट ब पदावरील कामकाजाचा तीन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे.

वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क (Rajya Lokseva Hakka Aayog)आयोग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये 59 ते 63 या वयोगटातील व्यक्तीच केवळ अर्ज करू शकतात. यापेक्षा वयाने लहान असणारे किंवा जास्त असणारे उमेदवारी यासाठी अर्ज करू शकत नाही

अर्ज पद्धती | Rajya Lokseva Hakka Aayog

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्याचप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला पत्ता देत आहोत त्या पत्त्यावर तुम्ही हे अर्ज भरून पाठवायचे आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता

राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, यांचे कार्यालय सातवा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा रोड मुंबई, 400032 या पत्त्यावर तुम्हाला पोस्टाने तुमच्या अर्ज पाठवायचे आहे

अर्ज कसा करायचा

  • महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क या आयोगाअंतर्गत होणारी भरती ही ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज हे दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला सादर करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मार्च 2024 आहे त्यामुळे तुम्ही यावेळी आधीच अर्ज करायचे आहेत.