हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि इंडियाचे वॉरेन बफे’ म्हणून ओळखले जाणारे Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने आर्थिक जगतात एकच शोककळा पसरली आहे. झुनझुनवाला यांनी गेल्या महिन्यात 5 जुलै रोजी 62 वा वाढदिवस साजरा केला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या झुनझुनवाला यांचा बिग बुल बनण्यापर्यंतचा प्रवास एकदम रोमांचक आहे. चला तर मग त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊयात …
1985 मध्ये कॉलेजमध्ये असतानाच Rakesh Jhunjhunwala यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी BSE सेन्सेक्स 150 अंकांच्या आसपास होता. यावेळी झुनझुनवाला यांनी अवघ्या 5,000 रुपयांद्वारे गुंतवणूक सुरू केली. मात्र, त्याकाळी ही रक्कम देखील खूप जास्त होती. हे लक्षात घ्या कि, आता राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 46 हजार कोटी रुपयांवर आहे.
पहिला नफा
Rakesh Jhunjhunwala यांना टाटा टीकडून शेअर बाजारात पहिला मोठा नफा मिळाला. 1986 मध्ये झुनझुनवाला यांनी 5 लाखांचा नफा कमावला होता. यावेळी त्यांनी टाटा टीचे 5,000 शेअर्स खरेदी केले होते. बघता बघता अवघ्या तीन महिन्यांत ते 143 च्या पातळीवर पोहोचले. अशा प्रकारे त्यांनी गुंतवलेले पैसे 3 पटीने वाढले.
कधी काली शेअर बाजारातील बेअर्समध्येही केली जात होती गणना
शेअर मार्केटमध्ये बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले Rakesh Jhunjhunwala हे हर्षद मेहताच्या काळात बेअर होते. हर्षद मेहता घोटाळ्यानंतर झुनझुनवाला यांनी शेअर्स विकून भरपूर पैसा कमावला. झुनझुनवाला यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी याकाळी शेअर्स विकून खूप पैसे कमावले. यावेळी ते बेअर्स ग्रुपचा एक भाग होते. अशाच एका बेअर्स कार्टेलचे नेतृत्व करत होते मनू मानेक ज्यांना ब्लॅक कोब्रा से म्हणूनही ओळखले जाते, त्यामध्ये राधाकिशन दमानी आणि Rakesh Jhunjhunwala यांचा देखील समावेश आहे. हर्षद मेहता यांच्यावर बनवलेल्या स्कॅम 1992 या वेबसिरीजमध्येही या सर्वांचा उल्लेख केला गेला आहे. 1992 मध्ये पत्रकार सुचेता दलाल यांनी हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणला, त्यानंतर शेअर बाजार जोरदार कोसळला होता.
2003 मध्ये सुरू केली स्वतःची ट्रेडिंग फर्म
Rakesh Jhunjhunwala यांनी 1987 मध्ये रेखा झुनझुनवालासोबत लग्न केले. त्या देखील शेअर बाजारातील गुंतवणूकदार होत्या. 2003 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी स्वतःची स्टॉक ट्रेडिंग फर्म Rare (RARE) एंटरप्रायझेस सुरू केली. स्वतःचे आणि पत्नीचे नाव एकत्र करून हे नाव देण्यात आले.
पोर्टफोलिओमध्ये आहेत 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 33 स्टॉक
Rakesh Jhunjhunwala आणि असोसिएट्सकडे सार्वजनिक डोमेनमध्ये 33 स्टॉक्स आहेत, ज्याची किंमत 25,842.3 कोटी रुपये आहे. ट्रेंडलाइनच्या मते, यामध्ये टायटन कंपनी, टाटा मोटर्स, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी, मेट्रो ब्रँड्स, फोर्टिस हेल्थकेअर, नझारा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्स यांसारख्या शेअर्सचा समावेश आहे. त्यांची सर्वात मौल्यवान लिस्टेड होल्डिंग आहे घड्याळ आणि दागिने बनवणारी कंपनी टायटन, ज्याची किंमत रु 8,830.9 कोटी आहे. त्याखालोखाल स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी 4,957.1 कोटी आणि मेट्रो ब्रँड्स 2,391.3 कोटींसह आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://en.wikipedia.org/wiki/Rakesh_Jhunjhunwala
हे पण वाचा :
Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या आठवडाभरातील सराफा बाजाराची स्थिती !!!
स्वस्तात सोने खरेदीची संधी !!! RBI कडून Sovereign Gold Bond योजनेची दुसरी सीरीज जाहीर
Axis Bank ने FD वरील व्याजदरात पुन्हा केले बदल, आता किती रिटर्न मिळेल ते पहा
Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनाने आर्थिक जगतात शोककळा !!! अनेक दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Central Bank Of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, आता किती फायदा होणार ते पहा !!!