आता हेच आमचं घर…! इफ्तार पार्टी प्रकरणाबद्दल राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाचे रुग्ण दिल्लीमध्येही वाढत आहेत. दिल्ली सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. अशातच केंद्र सरकारने लागू केलेलया कृषी कायद्याला विरोध दर्शवत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनेचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. मागील पाच महिन्यांपासून शेतकरी इथे आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जाणार नाही. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान एका वृत्तसंस्थेशी बोलताना ‘आता हे आमचे घरच झाले आहे…. ‘ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना राकेश टिकैत म्हणाले की,’ शेतकरी त्यांच्या घरी आहेत. आम्ही त्यांना कुठे जायला सांगू ? आम्ही येथे मागील पाच महिन्यांपासून राहत आहोत हे आता आमचं घर आहे… बऱ्याच शेतकऱ्यांना लस दिली आहे पण दुसरा डोस मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. आम्ही अधिकाऱ्यांना इथे शिबीर लावण्यास सांगितले आहे. अशी माहिती राकेश टिकैत यांनी दिली आहे.

दरम्यान दिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील इफ्तार पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याबाबत विचारलं असता राकेश टीकेत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की,’ लोक एकमेकांपासून दूर बसले होते. शासनाने परवानगी 50 लोकांची दिलेली. तिथे 20-35 लोक होते. कोणी कोणाला भेटलं नाही कोणाशी हस्तांदोलन केलं नाही’ अशी प्रतिक्रिया टिकेत यांनी दिली आहे. दरम्यान संबंधित इफ्तार पार्टीमध्ये सोशल डिस्टंसिंग पालन केलं नसल्याची बाब समोर आली होती. याशिवाय मास्क ही लावले नसल्याची बाब समोर आली होती.