सातारा जिल्हयात नवे 1 हजार 815 कोरोनाबाधित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचे मृत्यूचे तांडव सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत बाधितांचा मृत्यू हा चाळीसच्या घरात येत आहे. बांधितांच्या मृत्यूने जिल्ह्यात भयभीत वातावरण झालेले पहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत 1 हजार 815 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 16 हजार 855 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 88 हजार 009 आहे. तर जिल्ह्यात एकूण 68, 926 बरे झाले ली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2233 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येण्याचे रेकाॅर्ड चालूच आहे. दुसऱ्या लाटेतील सर्वाेच्च उंचाक बांधितांचा गेल्या चोवीस तासांतील झाला आहे. काल उंच्चाकी 1 हजार 695 कोरोना बाधितांचा आकडा आला होता, त्यांचे रेकाॅर्ड मोडून आज 1 हजार 815 बाधितांचा नवा उंच्चाक झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी कमी पडू लागली आहेत.

Leave a Comment