जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी
रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहा अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. मागील निवडणुकीत जसा विजय मिळाला तसाच विजय यावेळीही आम्ही मिळवू असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. लोकांना दिलेले आश्वासने आम्ही पूर्ण केली असुन विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढवत असल्याचे यावेळी रक्षा खडसे म्हणाल्या .
जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार ए टी नाना पाटील यांची उमेदवारी पक्षाने नाकारल्याने त्या मुळे नाराज झालेले पाटील यांनी माझ्या विरुद्ध गिरीश महाजन यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. याबाबत यावेळी गिरीश महाजन म्हणाले कि त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत . तिकीट देणारा मी नसून तसा कुठलाही एका व्यक्ती कडे अधिकार नसतो . त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे.
हे पण वाचा –
या कारणामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा जोरदार विरोध
‘म्हणून’ माझ्या वाट्याला वनवास – एकनाथ खडसे
उत्तर मुंबईत काँग्रेसचा हा ठरणार नवा उमेदवार ?