Ram Mandir : अयोध्येत तब्बल ५०० वर्षानंतर रामलला विराजमान झाले आहेत. २२ जानेवारीला त्याच्या प्राण प्रतिष्ठांपनेचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. आता देशातल्या रामभक्तांना राम दर्शनाची ओढ लागली आहे. रोज हजारो पर्यटक अयोध्येला भेट देतात. याकरिता देशभरात विशेष रेल्वे (Ram Mandir) सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. आता सांगलीकरांना सुद्धा रामाचे दर्शन घेण्याची संधी आहे.
येत्या 13 फेब्रुवारीला सांगली रेल्वे स्थानकावरून अयोध्येसाठी विशेष रेल्वे (Ram Mandir) धावणार आहे कानपूर प्रयागराज मार्गे ती रेल्वे आयोध्याला जाणार आहे. शिवाय आयोध्यातून रेल्वे 16 तारखेला परतणार आहे.
रेल्वेचे वेळापत्रक
मंगळवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री 11:45 वाजता सांगली स्थानकावरून अयोध्या धाम जाणारी विशेष रेल्वे गाडी क्रमांक 0 1 4 8 सुटणार आहे. त्यानंतर शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ 20 वाजता आयोध्यातून ही गाडी क्रमांक 0 1 4 9 सांगली स्थानकावर परत येणार आहे. आयोध्या (Ram Mandir) ला जाणारी ही विशेष रेल्वे इतर मोठ्या जंक्शन प्रमाणात सांगली रेने रेल्वे स्थानकावर जास्त वेळ म्हणजे पाच मिनिटे थांबणार आहे.
या स्थानकांवर घेणार थांबा
सांगली स्टेशन वरून सुटून ही गाडी सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, भुसावळ, इटारसी ,भोपाळ, बिना, झांसी, ओरई, कानपूर, फतेपुर, प्रयागराज येथून थांबून गुरुवारी 15 फेब्रुवारीला दुपारी एक वाजता आयोध्या धाम (Ram Mandir) येथे पोहोचेल.
आरक्षण कधीपासून ? (Ram Mandir)
तुम्हाला या गाडीचा आरक्षण करायचं असल्यास बुधवारी सकाळी आठ वाजता हे आरक्षण सुरू होणार आहे. ही गाडी फक्त एकच दिवस धावणार त्यामुळे इच्छुक प्रवाशांनी तातडीने बुकिंग करावे असे सांगण्यात आले आहे. प्रवासाच्या सुरुवातीचे स्थानक व बोर्डिंग स्टेशन म्हणून सांगलीचा उल्लेख करावा (Ram Mandir) असं आवाहन देखील करण्यात आला आहे.
सांगलीकरांना प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावं यासाठी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखरकर यांनी मध्य रेल्वे कडे श्रीरामंच्या दर्शनासाठी सांगलीतून अयोध्येला गाडी सुरू करण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करत मध्य रेल्वेने भाविकांसाठी विशेष रेल्वे दिली आहे त्याप्रमाणे (Ram Mandir) मंच न सांगली हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असल्याने तिथे पाच मिनिटाचा थांबा करण्याची विनंती ही केली होती ती ही रेल्वे मान्य केली आहे.
या रेल्वे प्रवासामुळे भाविकांना गुरुवार व शुक्रवार (Ram Mandir) दोन दिवस आयोध्ये मध्ये राहण्यास मिळतील परतीच्या प्रवासात ही गाडी आयोध्या धाम येथून शुक्रवारी रात्री सुटेल परतीच्या प्रवासातही त्याच स्थानकांवर थांबून सांगली रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे रविवारी 18 फेब्रुवारीला सकाळी दहा पन्नास वाजता पोहोचणार आहे.