राम मंदिरासाठी 2500 कोटींचा निधी जमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येमध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराच्या बांधकामासाठी भारतातील सर्व राज्यात निधी जमा करण्याचे काम सुरू होते. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून हा निधी जमा केला जात होता. देशातील प्रत्येक गावातून हा निधी जमा करण्यात आला आहे. देशातील या सर्व गावातील निधी मिळून या सर्व निधीचा आकडा आता 2.5 हजार कोटी झाला आहे. त्यामुळे आता निधी गोळा करण्याचे काम थांबवण्यात आले आहे.

कारण गेल्या काही दिवसांमध्ये निधी गोळा करण्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर आता अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यासोबतच, आत्तापर्यंत राम मंदिरासाठी अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

“राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली आहे. लोकांना जर देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी. त्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईटवर ते जाऊ शकतात. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पण येत्या ३ वर्षांमध्ये राम मंदिराची उभारणी पूर्ण होईल. अशी माहिती राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment