Ram Mandir : ना थांबतोय भक्तांचा ओघ , ना पैशाचा पाऊस…! रामलल्लावर श्रद्धेची कमालीची क्रेझ

ram mandir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन झाल्यापासून राम मंदिरला भेट देण्यासाठी पर्यटक आणि राम भक्तांची रीघ लागली आहे. दररोज लाखो भाविक राम मंदिराला भेट देत आहेत. 22 जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापासून आतापर्यंत सुमारे 15 लाख भाविकांनी बालकरामांचे दर्शन (Ram Mandir) घेतले आहे. हे आकडे सातत्याने वाढत आहेत. आयुक्त गौरव दयाल, आयजी प्रवीण कुमार आणि डीएम नितीश कुमार यांनी शनिवारी राम मंदिर परिसराची पाहणी केली. यादरम्यान रामललाला विक्रमी दानही दिले जात आहे.

याबाबत माहिती देताना आयुक्त म्हणाले की, दररोज सुमारे दोन ते अडीच लाख लोक (Ram Mandir) राम मंदिरात दर्शनासाठी पोहोचत आहेत. पूर्वी जिथे गर्दी एकत्र मंदिरात प्रवेश करत होती, आता त्यातही बदल झाला आहे. आता दर्शनासाठी लोक समूहाने येत आहेत. भविष्यातही हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. रामाच्या दर्शनासाठी भाविकांची (Ram Mandir) वाढती गर्दी पाहता मंदिर ट्रस्टने बाळकरामाच्या आरती आणि दर्शनाची वेळ वाढवली आहे.

रामलला साठी भरभरून दान

राम भक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने (Ram Mandir) भरभरून दान करीत आहेत. आकडेवारी सांगायची झाली तर रामललाच्या दर्शनाच्या पहिल्या दिवशी 2 कोटी 90 लाख रुपये, 24 जानेवारीला 2 कोटी 43 लाख रुपये, 25 जानेवारीला 8 लाख 50 हजार रुपये आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी 1 कोटी 15 लाख रुपये दान करण्यात आले होते.

मंदिरात आरतीची वेळ (Ram Mandir)

  • पहाटे साडेचार वाजता बाळकरामची मंगला आरती.
  • सकाळी 6:30 वाजता श्रृंगार आरती (उत्थान आरती).
  • सकाळी ७.०० वाजल्यापासून भाविकांना दर्शन.
  • दुपारी 12:00 वाजता भोग आरती.
  • सायंकाळी साडेसात वाजता आरती.
  • रात्री 9:00 वाजता जेवण.
    रात्री 10 वाजता शयन आरती होईल.