Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्यानगरी सजली!! राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य

Ram Mandir Pran Pratishtha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ram Mandir Pran Pratishtha : आजचा दिवस भारताच्या इतिहासात सर्वात सुवर्णदिवस असेल, कारण आज अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya) उदघाटन होणार असून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. देशभरातील अनेक दिग्गजांची रामभक्त मोठ्या संख्येने अयोध्येकडे रवाना झाला आहे. संपूर्ण अयोध्येत आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं आहे. मोठी सुरक्षा सुद्धा याठिकाणी तैनात करण्यात आली आहे.

कधी आहे शुभ मुहूर्त- Ram Mandir Pran Pratishtha

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील सर्व क्षेत्रातील ८००० हुन अधिक दिग्गज, ४००० साधू या भव्य दिव्या सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी १२.२० वाजता अभिजीत मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सुरुवात (Ram Mandir Pran Pratishtha) होणार आहे. 12 वाजून 29 मिनिट आणि 08 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिट आणि 32 सेकंद ८४ सेकंद चा शुभ मुहूर्त असणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु असताना संपूर्ण अयोध्येवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी होणार आहे. दुपारी २ नंतर विशेष आमंत्रितांना प्रभुरामांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

या भव्य दिव्य सोहळ्यापूर्वीच राम मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. अयोध्यातील प्रत्येक रस्ता आणि गल्लीबोळ सजवली गेली आहे. देशातील दिग्गज लोक याठिकाणी येणार असल्यामुळे अयोध्येत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस, निमलष्करी दलाबरोबर गुप्तचर संस्थांचे अधिकारी याठिकाणी तैनात असल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण अयोध्येनगरीसह देशात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात येत आहेत.