कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरू असलेल्या त्रिनय स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘रामकृष्ण वेताळ 11 कराड उत्तर’ या संघाने बाजी मारली. या संघाचा अंतिम सामना ‘श्री 11’ या संघाबरोबर पार पडला. यावेळी अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात रामकृष्ण वेताळ ११ कराड उत्तर या संघाने नेत्रदीपक असा विजय मिळवला आणि प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज चषकावर आपले नाव कोरले.
त्रिनय स्पोर्ट्स कराड आणि नाना फौजी यांच्यावतीने संबंधित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. अंतिम सामन्यानंतर विजयी संघाला करंडक आणि रोख बक्षीस देण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक अतुल शिंदे, कराड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष पोपटराव साळुंखे, नगरसेवक राजू मुल्ला, भाजप किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, नयन निकम, कराड तालुका अध्यक्ष सूर्यकांत पडवळ, स्वप्निल हुलवान यांची प्रमुख उपस्थिती होती. विजेत्या संघातील खेळाडूंसह रामकृष्ण वेताळ यांनी हा करंडक स्वीकारला. यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रथमच सहभागी झालेल्या या संघाला पहिल्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चषकवर आपले नाव कोरून वेगळा इतिहास निर्माण केला आहे.




