हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. एमआयएमने महाविकास आघाडीला थेट प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भन्नाट कविता करत यावर भाष्य केले आहे.
रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हंटल की, एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन. एमआयएमशी कोणी युती करीत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे.” यातून त्यांनी एमआयएमसोबत कोणी युती करत नाही त्यामुळे त्यांनी स्वबळावर लढावे असा सल्ला कवितेच्या माध्यमातून दिला आहे.
एम आय एम ची आहे हार्डलाईन
त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन !
एम आय एम शी कोणी युती करीत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे.— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 20, 2022
दरम्यान, एमआयएमच्या प्रस्तावानंतर शिवसेनेची कोंडी झाली आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम असून त्यांच्यासोबत युती शक्यच नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव फेटाळला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अद्याप ठोस असा निर्णय जाहीर केलेला नाही.