‘आदित्यऐवजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी अधिक योग्य – रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | आठवडाभरात राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. येत्या 24 ऑक्टोबरला राज्याची सुत्रे कोणाच्या हातात असणार हे स्पष्ट होणार आहे. तर, एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महायुतीतील रिंपाईंचे नेते रामदास आठवले म्हणाले, “शिवसेनेला भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरेंऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा असं मी उद्धव ठाकरेंना नक्की सांगेन,” असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे ही पहिली व्यक्ती यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. आदित्य यांनी वरळी विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. अनेक शिवसेना नेत्यांनी आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असे मत व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमिवर आठवले यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘ वरळी हा आमचा बालेकिल्ला आहे. सर्व आंबेडकरी मते आदित्य यांना मिळतील. मराठी मते मिळतील आदित्य ठाकरे चांगल्या मतांनी निवडून येणार आहेत. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न शिवसेनेला रंगावायला हरकत नाही. मात्र सध्याचे चित्र पाहता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले, शिवसेनेच्या जास्त जागा आल्यास आदित्य यांच्याऐवजी उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे असं मी आवर्जून म्हणेल. आदित्यला मुख्यमंत्री करण्याची शिवसेनेची तयारी आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला, जनतेला सर्वांना आदर आहे पण सध्याच एकदम ते मुख्यमंत्री पद सांभाळू शकतील असं वाटत नाही,’ असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच, आताच्या घडीला तरी फडणवीसंच पुन्हा मुख्यमंत्री होतील हे तसे स्पष्ट आहे. परंतु ‘राजकारणामध्ये कधी काहीही होऊ शकतं. शिवसेनेच्या जास्त जागा आल्या तर आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासाठी नंबर लागू शकतो. पण अशावेळी आदित्य ठाकरेंऐवजी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हा असं मी त्यांना सांगेन. असं आठवले म्हणाले. मात्र, देवेंद्रजीच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं. मुख्यमंत्रीपदी उद्धवजींचा आणि आदित्य ठाकरेंचा नंबर लागेल असं वाटतं नाही. आदित्य यांना मुख्यमंत्री होण्यास वेळ आहे अजून १०-१५ वर्ष त्यांनी वाट पाहिली पाहिजे,’ असंही आठवले म्हणाले. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये आठवले बोलत होते.

इतर काही बातम्या-