पेट्रोल दरावरून प्रश्न विचारताच रामदेव बाबा संतापले; पत्रकारावरच केली आगपाखड (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डीझेलच्या दरवाढीने जनतेला झटका बसला असतानाच याच संदर्भात योगगुरू बाबा रामदेव यांना त्यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत एका पत्रकाराने सवाल केला असता त्यांनी थेट पत्रकारावरच आगपाखड केली. रामदेव बाबांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हरियाणातील कर्नाल येथे एका कार्यक्रमात एका पत्रकाराने रामदेव बाबांच्या विधानाबाबत प्रश्न केला की, तुम्ही म्हटलं होते लोकांना अशा सरकारसाठी विचार केला पाहिजे जे ४० रुपये प्रति लीटर पेट्रोल आणि ३०० रुपये प्रति लीटर सिलेंडर देऊ शकतील. यावर रामदेब बाबा म्हणाले की, मी असे म्हटलं होतो, तुम्ही काय करु शकता? असा प्रश्न विचारु नका. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा ठेका घेतला नाही. तुम्ही काही प्रश्न विचाराल आणि मी त्याचे उत्तर देईल.

पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला की, तुम्ही सगळ्या मीडिया चॅनल्सला बाईट दिला आहे. यावर रामदेव बाबांनी पत्रकाराकडे इशारा करत म्हटले की, मी प्रतिक्रिया दिली होती परंतु आता नाही देत, काय करणार तु? आता शांत बस, जर आता विचारले तर बरोबर नाही. एकदा सांगितले ना मग जास्त उद्धटपणा नको, तु सभ्य आई-बाबांचा मुलगा आहेस असे रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या 9 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी पुन्हा एकदा लिटरमागे 80 पैशांची वाढ करण्यात आली. गेल्या 10 दिवसांत एकूण 6.40 रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. अशा स्थितीत दिल्लीत पेट्रोलचा दर 101.01 रुपये प्रति लीटरवरून 101.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.27 रुपये प्रति लिटरवरून 93.07 रुपये प्रति लिटर झाला आहे.

Leave a Comment